जळगाव, दि. 16:- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वैकल्पिक वाद निवारण
केंद्राच्या नविन इमारतीचे उदघाटन मुंबई उच्च् न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती
व प्रमुख आश्रयदाते व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई च्या कार्यकारी
अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीमती विजया कमलेश तहिलरामाणी यांचे हस्ते रविवार 17
डिसेंबर, 2017 रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात होणार
आहे. अशी माहिती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा चेअरमन, जिल्हा विधी सेवा
प्राधिकरण जळगाव कु. सविता टी बारणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली
आहे.
या कार्यक्रमास औरंगाबाद खंडपीठ न्यायमुर्ती
एस. व्ही. गंगापुरवाला, न्यायमूर्ती संगीतराव एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती
रहाणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा चेअरमन,
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव कु. सविता टी. बारणे या राहणार आहेत.
०००००
No comments:
Post a Comment