जळगाव, दि. 20 - राज्यातील अनुसुचित
जाती, जमातीच्या उद्योजकांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष सामुहिक
योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हयात 27 डिसेंबर पासून
तालुकानिहाय मेळावे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे
महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांनी दिली आहे.
या मेळाव्यातंर्गत पंचायत समिती,
मुक्ताईनगर येथे 26 डिसेंबर, 2017 रोजी तर पंचायत समिती, बोदवड येथे 27 डिसेंबर
2017 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत उद्योग निरिक्षक एम. आर. सरकटे हे मार्गदर्शन
करणार आहे. पंचायत समिती, जामनेर येथे उद्योग निरिक्षक एस.डब्ल्यु.विंचुरकर हे 27
डिसेंबर, 2017 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत मार्गदर्शन करतील. पंचायत समिती,
भुसावळ येथे 28 डिसेंबर 2017 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत उद्योग निरिक्षक एम.
आर. सरकटे हे मार्गदर्शन करणार आहे.
तसेच पंचायत समिती, धरणगाव येथे 28 डिसेंबर
रोजी, पंचायत समिती, चोपडा येथे 29 डिसेंबर रोजी तर पंचायत समिती, चाळीसगाव येथे
30 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत उद्योग निरिक्षक एस.डब्ल्यु.विंचुरकर हे
मार्गदर्शन करणार आहे.
त्याचबरोबर पंचायत समिती, पारोळा येथे 2
जानेवारी रोजी, पंचायत समिती, अमळनेर येथे 4 जानेवारी रोजी तर पंचायत समिती,
एरंडोल येथे 5 जानेवारी 2018 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत उद्योग निरिक्षक एस.टी.
लासूरकर हे मार्गदर्शन करणार आहे.
या
मेळाव्यांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या सुधारीत
बीज भांडवल योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन
योजना, खरेदी धोरणात प्राधान्य (GeM)
व्हेडर डेव्हलपमेंट कौशल्य विकास, व्हेंचर केपिटल, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान,
आर्थिक सहाय्य योजना, तसेच अनुसुचित जाती, जमाती मधील उद्योजकांसाठी मुंबई येथे
प्रस्तावीत राष्ट्रीय मेगा परिषद जानेवारी 2018 बाबत माहिती दिली जाणार आहे.
तालुकास्तरावरील
सर्व संबंधित बँकांचे अधिकारी, मिटकॉन, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे
अधिकारी मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याने अनुसुचित जाती,
जमातीच्या उद्योजकांनी हजर राहून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. पाटील,
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment