जळगाव दि. 13- जळगाव, भुसावळ, बोदवड,
यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यात कापुस, सोयाबीन, व तुर हे पिक मोठ्या
प्रमाणात घेतले जाते. शासनाने या पिकांचे
सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांची नेमणूक
केली आहे. सद्यस्थितीत कापुस, सोयाबीन व तुर पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून
आलेला आहे.
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा
प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्बे
15.8 ईसी 7 मिली प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे. कपाशीवरील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर
गेल्यास नियंत्रणासाठी फेनप्रोपाथ्रीन 30 ई.सी. 3.5 मीली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाचे घाटेअळीच्या प्रादुर्भावासाठी निरीक्षण करावे.
शेतात प्रती हेक्टरी 50 पक्षी थांबे उभारावे. हेक्टरी 5 कामगंध सापळे उभारावेत.
असे उपविभागीय कृषी अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment