जळगाव,
दि. 12 -
संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने 26 ते 30 डिसेंबर
2017 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सहावी महाराष्ट्र लेखा व स्थानिक निधी लेखा
गट-क सेवा विभागीय परीक्षा (भाग -1 व भाग -2) परीक्षेचे आयोजन नाशिक शहरातील
शासकीय कन्या विद्यालय, जुन्या सि.बी.एस.जवळ, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जिल्हा
परिषद स्टेडीयम, नाशिक या
परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
या
परिक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी, परिक्षेचे वेळापत्रक
व ओळखपत्राचा नमुना जिल्हा कोषागार कार्यालय नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार
यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच संचालनालयाचे परिपत्रक हे
इंटरनेटवरुन डाउनलोड करण्यासाठी http://www.mahakosh.in/Dat(Mahakosh.in)/ employee corner मधील Exams या टॅबमध्ये किंवा Dar (Mahakosh.in)
च्या Notice Board वर उपलब्ध आहे.
परिक्षेसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी त्या त्या जिल्ह्यातील कोषागार
कार्यालयांशी संपर्क साधून त्यांचेकडुन परिक्षेचे वेळेपत्रक व ओळखपत्राचा नमुना
प्राप्त करुन घ्यावे. अधिकृत ओळखपत्रासह परिक्षेस उपस्थित रहावे. असे आवाहन
लक्ष्मण पाटील, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment