जळगाव दि. 2 - जळगाव, भुसावळ, बोदवड,
यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यात कापूस, सोयाबिन, तुर हे पिक मोठ्या प्रमाणात
घेतले जाते. शासनाने या पिकांचे सर्वेक्षण
करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांची नेमणूक केली आहे.
सद्यस्थितीत कापूस, सोयाबिन व तुर पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे.
घाटे अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन
बेन्झोंएट 5 एस जी 4 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. हरभा-यावरील घाटे
अळीच्या प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ दिसत असल्यास, प्रादुर्भाव
आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेन्झोंएट 5 एस जी 4
ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. मर रोगाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास
अशी झाडे उपटून नष्ट करावीत.
कपाशीवर तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर
गेल्यास नियंत्रणासाठी फ्लोनिकामिड 50 डब्लू जि 4 ग्रम प्रती 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. पिकाचे नियमित सर्वेक्षण करुन किडीच्या प्रादुर्भावावर लक्ष
ठेवावे. तुडतुडे आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेल्यास
नियंत्रणासाठी फ्लोनिकामिड 50 डब्लू जि 4 ग्रम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
तुरीवरील शेंगा पोखरणा-या अळीच्या
नियंत्रणासाठी इंडोक्झाकार्ब 15.8 ईसी 7 मिली प्रती 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून
फवारावे.
पाने गुंडाळणा-या अळीने गुंडाळलेली
पाने जमा करुन नष्ट करावीत. शेंदरी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपाथ्रीन 30
ई.सी.3.5 मीली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कोळपणी व खुरपणी करुन शेत तण विहिरीत
ठेवावे. कपाशीवर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर दिसत
आहे. नियंत्रणासाठी फेनप्रोपाथ्रीन 30 ई.सी. 3.5 मीली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
हरभरा
पिकाचे घाटे अळीच्या प्रार्दर्भावासाठी निरीक्षण करावे. शेतात प्रती हेक्टरी 50
पक्षी थांबे उभारावेत. गरज भासल्यास 5% निबोंळी अर्काची किंवा एचए.एन.पी.व्ही.@500 मिली + एक चमचा नीळ प्रती हेक्टर फवारणी करावी. मर
रोगाची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास अशी झाडे उपटून नष्ट करावीत.
तूर पिकाचे शेंगा पोखरणा-या अळीच्या
प्रादुर्भावासाठी निरीक्षण करावे. पुढील होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 5%
निबोंळी अर्काची फवारणी करावी.
०००
No comments:
Post a Comment