Thursday, 14 December 2017

कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमासाठी 26 डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत



     जळगाव, दि. 14 -  प्रकल्प संचालक, आत्मा यांचेमार्फत कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद जि. जळगाव येथे कृषि (खत) विक्रेत्यांकरीता केंद्र सरकार मान्यताप्राप्त कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रम (DAESI) सन 2017-18 मध्ये राबविण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी 26 डिसेंबर, 2017 पर्यंत प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, प्लॉट नं 10, पुष्कराज बिल्डींग, दिक्षीत वाडी, तुकाराम वाडीच्या समोर, जळगाव येथे अर्ज सादर करावेत. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा जळगाव  यांनी केले आहे.
          हा पदविका अभ्यासक्रम मॅनेज, हैद्राबाद यांनी निर्धारीत केलेल्या मार्गदर्शनानुसार 48 आठवडयांचा आहे. प्रथम अर्ज करणाऱ्या 40 प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवार किमान 10 वी पास, तसेच कृषि (खत) परवानाधारक असणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्वावर असल्यामुळे निवड झालेल्या कृषि (खत) विक्रेत्यांकडून संपुर्ण प्रशिक्षण फी वीस हजार रुपये आकारण्यात येणार आहे.
             अभ्यासक्रमासाठीचे निकष व अर्जाचा नमुना http:www.kvkjalgaon.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सदरील अभ्यासक्रमासाठी करावयाचा अर्ज प्रकल्प संचालक, आत्मा जळगाव, कृषि विकास अधिकारी, जळगाव व कृषि विज्ञान केंद्र, ममुराबाद, जि. जळगाव येथे उपलब्ध आहे. जास्तीत जास्त कृषि (खत) विक्रेत्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा जळगाव यांनी केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment