Saturday, 16 December 2017

टपाल विभागातर्फे ‘माती आणि चाक’ या विषयावर डाक तिकीट स्पर्धेचे आयोजन




          जळगाव, दि. 16 - भारतीय डाक विभागामार्फत गणतंत्र दिवस 2018 चे औचित्य साधून डाक तिकीट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माती आणि चाक’ (माटी और चाक) ( POTTER’S WHEEL) हा स्पर्धेचा विषय आहे.
               ही स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. चित्र/ पेंटिंग हे आपल्या स्वत:च्या रचनेवर (Own creativity) आधारित काढावे. चित्र/ पेटिंग सहाय्यक महानिदेशक (फिलाटेली) खोली नं. 108, डाक भवन, नवी दिल्ली-110001 या पत्यावर 22 डिसेंबर, 2017 पर्यंत पोहचेल अशा बेताने पाठवावे.
               या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये, दुसरे क्रमांकाचे बक्षीस पंचवीस हजार रुपये, तृतीय क्रमांकाचे बक्षीस दहा हजार रुपये तसेच प्रत्येकी पाच हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे दिली जाणार आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन अधीक्षक, डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डाक अधिक्षक कार्यालय किंवा 0257-2229679/ 2224288 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
०००००

No comments:

Post a Comment