Friday, 29 December 2017

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 29 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे शनिवार 30 डिसेंबर, 2017 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
            शनिवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 6.45 वाजता अमृतसर एक्सप्रेसने भुसावळ रेल्वेस्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह भुसावळकडे प्रयाण. सकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे आगमन व राखीव. सकाळी 8.45 वाजता श्री. बापुराव मांडे यांचे निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट. (स्थळ :- प्लॉट नं. 9, गुरुआस्था अपार्टमेंट, ओंकार कॉलनी, भुसावळ), सकाळी 9.15 वाजता आ. श्री. संजय सावकारे यांचे निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ :- प्रोफेसर कॉलनी, भुसावळ), सकाळी 10.00 वाजता प्रोफेसर कॉलनी येथून शासकीय वाहनाने शशीकल्प शिव कॉलनी, जामनेर रोडकडे प्रयाण. सकाळी 10.10 वाजता श्री. स्वप्नील चौधरी यांचे निवासस्थानी आगमन व सदिच्छा भेट. (स्थळ :- शशीकल्प शिव कॉलनी, जामनेररोड भुसावळ, जि.जळगाव), सकाळी 10.45 वाजता शासकीय वाहनाने सेंट अलायन्स स्कुल वॉटर फिल्टर हाउसकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता आगमन व अमृत योजनेच्या उदघाटनास उपस्थिती. (स्थळ :- सेंट अलायन्स स्कूल वॉटर फिल्टर हाउस, भुसावळ, जि.जळगाव), दुपारी 12.30 वाजता श्री. रमण भोळे, नगराध्यक्ष, भुसावळ यांचे निवासस्थानी आगमन व राखीव. (स्थळ :- देवलीला, म्युनिसीपल पार्क, सुभाष रोड, भुसावळ), दुपारी 1.30 वाजता भुसावळ येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.45 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. सायंकाळी 6.15 वाजता. जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व महाराष्ट्र एक्सप्रेसने साताराकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment