जळगाव, दि. 7 - विशेष
इंद्रधनुष्य मोहिमेतंर्गत अति जोखीमग्रस्त भागातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील एकही
बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. याप्रमाणे आरोग्य यंत्रणेने नियोजन
करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या.
विशेष इंद्रधनुष्य अभियानाच्या जिल्हा
समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. निंबाळकर यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा
आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, महिला
व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, श्री. तडवी, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.
उगले आदिंसह आरोग्य विभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ऑक्टोबर 2017 पासून विशेष
इंद्रधनुष्य अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत दरमहा 7 ते 14
तारखेपर्यंत जिल्ह्यातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात येत आहे.
स्क्षूम कृती आराखड्यानुसार ग्रामीण भागातील अतिजोखीमग्रस्त भागाची लोकसंख्या 5
लाख 55 हजार 769 इतकी आहे. यामध्ये 0 ते 2 वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित
राहिलेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 हजार 414 इतकी आहे. या मोहिमेतंर्गत मागील
महिन्यात झालेल्या दुसऱ्या फेरीत 142 बालकांचे लसीकरण करणे बाकी राहिल्याची माहिती
आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. आजपासून सुरु झालेल्या तिसऱ्या फेरीत जिल्ह्यातील
कोणीही बालक वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य विभागाने नियेाजन करुन विशेष
इंद्रधनुष्य अभियान जिल्हृयात यशस्वी करावे. तसेच नागरीकांनीही आपल्या 0 ते 2
वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम 28 जानेवारी 2018 रोजी
राबविण्यात येणार आहे. ही मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा आज जिल्हाधिकाऱ्यांनी
घेतला. या आढाव्यात या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेली
साधनसामुग्री, मनुष्यबळ याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. या मोहिमेची नागरीकांमध्ये
जास्तीत जास्त जनजागृती होण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात
आली.
00000
No comments:
Post a Comment