Wednesday, 27 December 2017

सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 27 - राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा गुरुवार 28 डिसेंबर, 2017 रोजीचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
            गुरुवार 28 डिसेंबर रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. दुपारी 1.00 वाजता पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.30 वाजता जळगावकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वाजता जळगाव येथे आमदार डॉ. सतिष अण्णा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ कार्यक्रमास उपस्थित (स्थळ :- नुतन मराठी कॉलेज, जळगाव), सायंकाळी 7.00 वाजता सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. रात्री 10.30 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 11.15 वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवरुन अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.                                                         00000

No comments:

Post a Comment