Wednesday, 20 December 2017

शाळांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव ऑफलाईन पाठविण्यास मान्यता



          जळगाव, दि. 20 -  समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्या या मॅन्युअली (ऑफलाईन) करणेबाबत शासनामार्फत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2017 -18 या वर्षाकरीता राबविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व विद्यालयांनी सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्याचे प्रस्ताव हे मॅन्युअली तयार करावेत. तसेच तालुकानिहाय वेळापत्रकानुसार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव या कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत जमा करावेत. अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड यांनी दिली आहे.
          समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांसाठीचे अर्ज ऑफलाईन पाठवून सन 2017-18 या वर्षात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यास अडचण येणार नाही व शिष्यवृत्तीच्या लाभापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही याची विद्यालयांनी नोंद घ्यावी. असेही श्रीमती राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment