Wednesday, 27 December 2017

एक पाऊल आत्मनिर्भतेकडे वीरपत्नीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण

          जळगाव दि. 27 :- डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत कौशल्य विकास प्रशाला हे रोजगारभिमुख केंद्र कार्यन्वीत आहे. राज्यतील शहीद जवानाच्या वीरपत्नी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘एक पाऊल आत्मनिर्भतेकडे’ या मोफत निवासी प्रशिक्षणात ‘फॅशन डिझाईनिंग आणि ब्युटी थेरपी’ हे अभ्यासक्रम तज्ञ मार्गदर्शकाकडून शिकविले जाणार आहेत. या अभ्यासक्रमास नोंदणीसाठी महाविद्यालयातील प्रा. सौ. एस. एस. राजपूत- 9975549735,  श्री. पुष्कर पाटील – 9028726889, प्रा. सौ. अनिता नांदेडकर-9823134392 आणि प्रा. सौ. पल्लवी पाटील – 7744007350 यांच्याशी संपर्क साधवा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. राणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment