Friday, 22 December 2017

ग्रामपंचायत निवडणूकीच्या कार्यक्षेत्रात मतदानासाठी 26 डिसेंबर रोजी स्थानिक सुट्टी



         जळगाव दि.22 - राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 26 डिसेंबर, 2017 रोजी मतदान होणार आहे. हा दिवस कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने यादिवशी नागरीकांना सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान करता यावे. याकरीता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्थानिक सुटी जाहिर केली आहे.
            या निवडणुक विभागातील व निर्वाचक गणातील सर्व नागरीकांना मतदान करता यावे, यासाठी ही सुट्टी उद्योग, उर्जा व कामगार विभाग निवडणूक क्षेत्रातील सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यादींना लागु राहील. ( उदा. राज्य शासन, केंद्रशासन, व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल , खाद्यगृह, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स रिटेलर्स इत्यादी)
       अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील मतदानाचा हक्क बजाविता येण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल. असे जिल्हाधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment