Tuesday, 26 December 2017

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे १ जानेवारीला आयोजन



        जळगाव, दिनांक 26 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जानेवारी या महिन्यातील लोकशाही दिन पहिला सोमवार 1 जानेवारी,2018 दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी  केले आहे.
0 0 0 0

No comments:

Post a Comment