जळगाव, दि. १८- दर महिन्याच्या
तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी
उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी तहसीलदार महेश चौधरी, जिल्हा परिषदेच्या
समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड, पोलिस उपनिरिक्षक सुचित्रा देशमुख, संरक्षण
अधिकारी आरती साळूंके आदि उपस्थित होते.
या बैठकीत
लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला. संबंधीत
विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या
सूचना निवासी उपजिल्हाधिकारी श्री. मुंडके यांनी दिल्या. आजच्या लोकशाही दिनात
जिल्हा उपनिबंधक विभागाशी संबंधित दोन व महसूल विभागाशी संबधीत एक अर्ज प्राप्त
झाला आहे. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याची
माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली.
००००००
No comments:
Post a Comment