Thursday, 14 December 2017

राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष मा. श्री. अरुण देशपांडे (मंत्रीस्तरीय) यांचा जळगाव जिल्हा दौरा



जळगाव, दि. १४-  राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय) तसेच राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष श्री. अरुण व. देशपांडे हे १५ डिसेंबर, २०१७ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शुक्रवार १५ डिसेंबर रोजी सकाळी 4 वा. 30 मि.नी नागपूर येथून सेवाग्राम ट्रेनने जळगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व मुक्काम. सकाळी 9 ते 10 वा. 30 मि.पर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अध्यक्ष श्री. भरत अमलकर यांची भेट व चर्चा. सकाळी 11 ते 1 वा. 30 मि. पर्यंत जैन पाटबंधारे येथे बैठक. दु. 3 ते 5 वाजेपर्यंत अन्न आयोगासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, पुरवठयासंबंधी सर्व अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. संध्याकाळी 5 वा. 30 मि. ते 6 वा. 30 मि. पर्यंत खाजगी समारंभास उपस्थिती. संध्या 7 वा. 30 मि. जळगाव येथून वाहनाने औरंगाबादकडे रवाना.
०००००

No comments:

Post a Comment