Thursday, 14 December 2017

ध्वजदिन निधी संकलनाचा 18 डिसेंबर रोजी शुभारंभ सैनिकांच्या कुटूंबियांचा होणार सत्कार



        जळगाव, दि. 14 - जिल्ह्यात ध्वजदिन निधी-2017 संकलनाचा शुभारंभ 18 डिसेंबर, 2017 रोजी अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
         यावेळी ध्वजदिन निधी संकलन -2017 चा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच शहीद, सैनिकांच्या कुटूंबियांचा सत्कार व शासनाच्यावतीने गौरव पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमात ध्वजदिन निधी-2016 निधी संकलनाचे कामी उत्कृष्ट कार्य केलेल्या शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिक, प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच  माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शिष्यवृत्ती वाटपही करण्यात येणार आहे.
         या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील ध्वजदिन निधी संकलन कामी काम केलेले कर्मचारी व जिल्ह्यातील माजी सैनिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment