जळगाव,
दि. 19 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे
मार्फत मार्च 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी)
परीक्षेस नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे
ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. त्यांच्या
सुधारित तारखा पुढीलप्रमाणे.
माध्यमिक
शाळांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाचा दिनांक नियमित शुल्कासह 28 डिसेंबर
2017 पर्यंत, माध्यमिक शाळांनी बॅकेत चलनाव्दारे शुल्क भरावयाचा 30 डिसेंबर 2017
पर्यंत, माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह
विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाचा 2 जानेवारी 2018 पर्यंत आहे. 28 डिसेंबर 2017 पर्यंत
संपर्क केंद्र माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या Excel मध्ये प्रिटींग
करणे, दि. 29 डिसेंबर 2017 पासून On Line Form
भरण्याची Link बंद होईल.
दि. 29 डिसेंबर 2017 ते दि. 6
जानेवारी 2018 पर्यंत संपर्क केंद्र माध्यमिक शाळांनी विलंब शुल्कासह स्वहस्ते
(Manually) आवेदनपत्रे भरुन ती विभागीय मंडळामध्ये समक्ष सादर करावयाची आहेत.
त्याकरीता Blank Template Form मंडळाच्या website वर उपलब्ध आहे.
परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन
पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे
भरण्यासाठी आपल्या निर्धारित संपर्क केंद्र शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन
आवेदपत्रे भरताना येणाऱ्या अडचणीबाबत मुख्याध्यापकांनी संबंधित विभागीय मंडळाशी
संपर्क साधावा. ऑनलाईन आवेदनपत्रे भरतांना विद्यार्थ्यांचे जन्मठिकाण नमूद
करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रीयेमध्ये करण्यात यावी.
विभागीय
मंडळातील शाळांनी प्रचलित शुल्क बँक ऑफ इंडियात मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन
बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत व विद्यार्थ्याच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय
मंडळाकडे सादर कराव्यात.
इयत्ता 10 वीची
आवेदनपत्रे भरतांना आधारकार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी
एखाद्या विद्यार्थ्याकडे आधारकार्ड नसेल तर आधारकार्ड नोंदणी क्रमांक देखील ग्राहय
धरण्यात येईल. आधारकार्डची नोंदणी देखील केलेली नसेल तर निकालापर्यंत आधारकार्ड
काढण्यात येणार असल्याचे हमी पत्र विद्यार्थ्याने संपर्क केंद्र शाळांच्या
मुख्याध्यापकांना देणे आवश्यक आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून आवेदनपत्र भरणे
नाकारता येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. या कालावधीमध्ये संपर्क
केंद्र शाळांनी On Line Pre-List Print
करुन Pre-List ची विद्यार्थ्यांमार्फत तपासणी करुन त्यांच्या On Line दुरुस्त्या 28 डिसेंबर 2017 पर्यंत करणे आवश्यक
आहे. मंडळामार्फत वेगळी प्री-लिस्ट दिली जाणार नसल्याचे पुणे राज्यमंडळाचे
सचिवांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment