Tuesday, 5 December 2017

जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लन समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न



      


      जळगाव, दिनांक 5 : जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निमुर्लन समितीची त्रैमासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील, जिल्हा प्रशासन अधिकारी न.पा.शाखा राजेश कानडे, नायब तहसिलदार मंदार कुळकर्णी आदि अधिकारी व तक्रारदार मोठया संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.निंबाळकर यांनी उपस्थितांना प्राप्त तक्रारींवर त्वरीत कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.
            या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव. महानगर पालिका, पारोळा नगर पालिका, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, यावल आदिवासी विकास प्रकल्प या विभागाशी संबंधीत असलेल्या प्राप्त तक्रारी बाबत चर्चा करण्यात आली .
            कृषि विभाग संबंधित तक्रारी बाबत चौकशी अधिका-यांनी जबाबदारी निश्चित करुन आपल्या अभिप्राय व पुराव्यासह प्रकरण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्यक्ष भेट देवुन पहाणी अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले. तसेच आदिवासी विभागासंबंधीत प्रकल्प अधिकारी यावल व अतिरिक्त आयुक्त आदिवासी विकास यांना पत्र देण्यात यावे. पुढील बैठकीपूर्वी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या सूचना या बैठकीत संबंधीतांना देण्यात आल्या. यावेळी तक्रार पेटी उघडुन प्राप्त अर्जाची नोंद करुन घेण्यात आली.
0 0 0 0

No comments:

Post a Comment