Tuesday, 19 December 2017

विभागीय आयुक्तांनी घेतला जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी यंत्रणेने मिशनमोडवर कामे पूर्ण करावी -विभागीय आयुक्त महेश झगडे



           
 
 
         जळगाव, दि. 19 - स्वच्छ भारत मिशनतंर्गत मार्च 2018 पूर्वी जिल्हा हागणदारीमुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. तसेच शौचालयांचे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी यंत्रणेने आवश्यक ते नियोजन करुन मिशनमोडवर कामे पूर्ण करावीत. यासाठी शौचालय बांधकामासाठी एक पंधरवाडा कालावधीत विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आज दिले.

          जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची आढावा बैठक विभागीय आयुक्त श्री. झगडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नियोजन भवनात पार पडली. यावेळी उपस्थितांशी चर्चा करतांना त्यांनी वरील निर्देश दिले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, विभागीय उपायुक्त सुकदेव बनकर, मित्रगोत्री आदि उपस्थित होते.
            यावेळी विभागीय आयुक्त्त श्री. झगडे म्हटले की, स्वच्छ भारत अभियान हा प्रधानमंत्री महोदयांचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. येत्या मार्चपर्यंत संपूर्ण् महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचा मुख्यमंत्री देवेंर्द फडणवीस यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने जिल्ह्यातील गाव, गण, गट, विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता शौचालयांच्या बांधण्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. त्याचबरोबर प्रधानमत्री आवास योजनेचा लाभ जिल्हयातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी. शबरी, रमाई, पारधी योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करावीत. सन 2015-16 मधील अपूर्ण घरकुले पूर्ण करणे, पंडीत दिन दयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थ सहाय्य योजनेतील 540 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करावेत.
          ग्राम विकासाचे महत्वाचे केंद्र ग्रामपंचायत आहे. गावाचा विकास ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने होणारी कामे व ग्रामपंचायतीच्या तपासणीच्या कामास प्राधान्य द्यावेत. ज्या ग्रामपंचायतीमध्ये त्रुटी व अनियमितता आढळून येईल त्यांचेवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात.त्याचबरोबर ग्रामपंचायतीमधील अपहार प्रकरणांचा आढावा घेऊन अपहारित रक्कम संबंधितांकडून वसुलीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्यात. या कामा हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्यात. तसेच ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या निधीचा विनियोग योग्यप्रकारे व्हावा यासाठी त्यांचे नियंत्रण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. तसेच आपले सरकार सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी.
            जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी बेटी बचाओ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यानुसार सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी धडक मोहिम राबविण्याचे निर्देशही त्यांनी  संबंधीत यंत्रणेला दिलेत. गरोदर माता व स्तनदा माता यांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेतंर्गत आहार योजना,  मुख्यमंत्री राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत मंजूर नळपाणी पुरवठा योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य टप्पा-2 अंतर्गत सुरु असलेली कामांचा तसेच दिव्यांग, मागासवर्गीय, महिला व बालकल्याणसाठीच्या निधीचे नियोजन, दलितवस्ती सुधारणा योजनेंतर्गत पूर्ण  व अपूर्ण कामे,  पेसा निधीच्या खर्चाचे नियोजन, 14 वा वित्त आयोग आर्थिक व भौतिक आढावा,  एनआरएचएम व विविध आरोग्य विषयक कार्यक्रम, सासंद आदर्श ग्राम योजना, आमदार आदर्श ग्राम योजना, ग्रामपंचायत करवसूली (पाणी पट्टी, घरपट्टी, औद्योगिक), राष्ट्रीय बायोगॅस योजना व विविध कृषी तसेच पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.
            त्याचबरोबर बांधकाम विभागाकडील खासदार निधी, आमदार निधी, डोंगरी विकास कार्यक्रमा अंतर्गतची कामे, लघुसिंचन विभागाकडील (जनरल, एससीपी, ओटीएसपी, डीपीसी ) अंतर्गत कामे,  आमचा गाव, आमचा विकास कार्यक्रमांतर्गत कार्यवाही व कामे पूर्ण करणे, जैव विविधता व्यवस्थापन करणे व स्थापन केलेल्या ठिकाणचे ठराव, कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये अन्य स्ट्रक्चर्समध्ये पाणी अडविणे,  सर्व शिक्षा अभियान व शैक्षणिक गुणवत्ता वाढ, साथीच्या रोगांचा उद्रेक होवू नये यासाठी घ्यावयाची दक्षता आदि विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.                                                   
000

No comments:

Post a Comment