Wednesday, 13 December 2017

मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी ऑनलाईन फार्म भरण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत



     जळगाव दि. 13 - अल्पसंख्यांक विकास विभागाच्यावतीने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची शैक्षणिक कर्ज योजना सुरु आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, सिख, पारसी, जैन) समाजातील गरीब गरजु विद्यार्थ्यासाठी (राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा 5 लाखापर्यत ज्यांचे उत्पन्न ग्रामीण भागासाठी 83 हजार व शहरी भागासाठी 1 लाख 3 हजार आहे) व (मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजना कर्ज मर्यादा 2 लाख 50 हजार पर्यंत ज्यांचे उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार आहे) यांच्यासाठी आहे. फक्त 3% व्याजदराने शैक्षणिक कर्ज योजना सुरु असुन ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत 15 जानेवारी 2018 पर्यंत आहे. तर ऑफलाईन फॉर्म जिल्हा कार्यालयात जमा करण्याची मुदत 31 जानेवारी 2018 आहे.  
            ऑनलाईन फार्म www.mamfdc.org या संकेत स्थळावर जावुन scheme मध्ये online application मध्ये new registration करावे व त्यात संपूर्ण माहीत भरावी. सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, आकाशवाणी चौक, ग्राहक मंचाच्या मागे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इमारत, जळगाव -425001 या पत्यावर फाईल जमा करावी. अधिक माहितीसाठी मो.  क्रमांक 7588007560 वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
 फॉर्म भरतेवेळी फोटो, आधार कार्ड, रहिवासी दाखला, कॉलेजचे ओळखपत्र, एल. सी. झेरॉक्स, मागील वर्षाचे मार्कशीट, कॉलेजचे चालू वर्षाचे बोनाफाईड, कॉलेजकडून संबधित शिक्षणाचे फीचे वर्ष निहाय फी तक्ता, त्यात कॉलेजमध्ये मेस व राहण्याची व्यवस्था असल्यास त्याचा खर्च देखील नमुद करावा, खाजगी खानावळ व रहिवास असल्यास शंभर रुपयांचा स्टॅम्‌पवर वर्षनिहाय खर्चाच्या तपशिलासह करारनामा सादर करावा. यामध्ये जात धर्माच पुरावा, राष्ट्रीयकृत बॅक, पासबुक झेरॉक्स असणे आवश्यक आहे.
            जिल्ह्यातील जास्तीत जास्त  अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा. असे जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment