जळगाव दि. 30 :- लोकसभा सार्वत्रिक
निवडणूक-2019 साठी जळगाव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेल्या इलेक्ट्रानिक मतदान
यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी (First Level Checking) दिनांक 3 ऑक्टोबर, 2018
पासून तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारात असलेल्या शासकीय धान्य गोदामामध्ये
भारत इलेक्ट्रॉनिक लि. बेंगलोर येथील अभियंत्यांमार्फत करण्यात येणार आहे.
भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी
(First Level Checking) करतेवेळी मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना
उपस्थित ठेवणेबाबत सुचित केलेले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय
स्तरावरील व राज्य स्तरावरील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी
(जिल्हाध्यक्षांनी नियुक्त केलेले) यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्रथम
स्तरीय तपासणी करीता (First Level Checking) तहसिल कार्यालय, भुसावळ येथील आवारात
उपस्थित राहता येईल.
गोदाम
परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून गोदामात प्रवेश करणाऱ्या
प्रत्येक व्यक्तीला मेटल डिटेक्टरच्या चाचणीस सामोरे जावे लागेल. तसेच गोदामात
कुठल्याही प्रकारच्या ईलेक्ट्रॉनिक वस्तु घेऊन जाता येणार नाही. मतदान यंत्रांच्या
प्रथमस्तरीय तपासणीचे व्हिडीओ शुटींग तसेच सी.सी.टी.व्ही. द्वारे चित्रण देखील
केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
000