जळगाव, दि. 14 - राज्य निवडणूक आयोगाने
ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
जळगाव
जिल्ह्यात सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 26 सप्टेंबर 2018
रोजी मतदान होणार असून हा दिवस कार्यालयीन
कामकाजाचा असल्याने या दिवशी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लागु असलेल्या
क्षेत्रात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मतदानाकरीता स्थानिक सुटी जाहिर
केली आहे.
जिल्ह्यातील
माहे ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने
स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींचा तपशिल-
जामनेर
–डोहरी, भारुडखेडा, धरणगाव –पष्टाणे खु, रावेर – आंदलवाडी, भडगाव – घुसर्डी खु., पारोळा
– मोंढाळे प्र.अ. असे आहेत.
जिल्ह्यात
सहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 26 सप्टेंबर 2018 रोजी
सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम लागु असलेल्या क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहिर
करण्यात येत आहे. सदर सुट्टी उद्योग,
उर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व अस्थापना, कारखाने, दुकाने, इत्यादींना
लागु राहील. ( उदा. राज्य शासन, केंद्रशासन व खाजगी कंपन्या यामधील अस्थापना, सर्व
दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्य गृह, नाटयगृह, व्यापार, औद्योगिक
उपक्रम किंवा इतर अस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेटर, मॉल्स,
रिटेलर्स इत्यादी.)
अपवादात्मक
परिस्थतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल
तर कामगारांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी दोन तासाची सवलत देण्यात यावी. असे
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment