जळगाव, दि.1- राज्याचे सामाजिक न्याय आणि
विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री
ना. दिलीप कांबळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा सुधारीत दौरा
कार्यक्रम पुढील प्रमाणे-
रविवार
दि. 2 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 8.00 वा.
शासकीय विश्रामगृह, अकोला येथून वाहनाने मुक्ताईनगरकडे जि.जळगावकडे प्रयाण. सकाळी
10.45 वा. मुक्ताईनगर येथे आगमन. सकाळी 11.00 वा अल्पसंख्यांकांसाठी पहिल्या
शासकीय तंत्रनिकेतन इमरतीचे भूमीपूजन, (स्थळ :- मुक्ताईनगर जि. जळगाव) दुपारी 2.30 वा. मुक्ताईनगर येथून शासकीय
वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे
आगमन. दुपारी 4.10 वा. जळगाव महानगरपालिकेला देण्यात आलेल्या विशेष घटक योजना दलित
वस्ती विकास निधीच्या माध्यमातुन गेल्या 8 वर्षात झालेल्या खर्चाचा आढावा बैठक.
(स्थळ :- अजिठा शासकीय विश्रामगृह. जळगाव)
सायं 5.00 वा. सामाजिक न्याय विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक ( स्थळ –
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव) सायं 5.30
वा. जळगाव जिल्हयातील मदत व पुनवर्सन विभागाच्या कामाचा आढावा बैठक. (स्थळ :- अजिठा शासकीय विश्रामगृह. जळगाव) सायं
6.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथुन शासकीय वाहनाने औरंगाबादकडे
प्रयाण.
000
No comments:
Post a Comment