जळगाव, दिनांक 1 - ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होण्यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेची निश्चितच मदत होईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी काढले. भारतीय डाक विभागातर्फे जिल्ह्यात 5 इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव चे खासदार श्री ए. टी. नाना पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला ताई पाटील, आमदार चंदुभाई पटेल, आमदार सुरेश भोळे, बँकेचे शाखा व्यवस्थापक मनीष तायडे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे
म्हणाले की, खरा भारत ग्रामीण भागात वसलेला आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये
बँकेची सुविधा नसल्यामुळे आर्थिक विकास सर्वांपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण
होतात. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमुळे आर्थिक विकास प्रत्येकाच्या दारापर्यंत
पोहोचण्यास मदत होऊन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत
निर्माण होण्यास मदत होईल. सरकारी नोकरदारांची पगाराची खाते इंडियन
पोस्ट पेमेंट बँकेत उघडल्यास राष्ट्रीयकृत बँकांवरील अतिरिक्त ताण कमी होईल.
इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून देशात आर्थिक क्रांती उभी राहील असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात खासदार ए. टी.
नाना पाटील यांनी बँकेतील गर्दी कमी होऊन सर्वसामान्य
जनतेची कामे जलदगतीने होईल. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमधून ज्या ग्रामीण भागात
बँकेचे व्यवहार पोहोचले नाहीत. तेथे डाक कर्मचारी त्यांच्या
घरी बँकेची सुविधा देतील. देशात एक लाख 55 हजार पोस्ट ऑफिस असून पाच लाख
कर्मचाऱ्यांच्या मदतीने इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने सर्व भारतीयांना बँकिंग सेवा
उपलब्ध करून दिली. जनतेचा पोस्ट खात्यावर असलेल्या विश्वास त्यामुळे या बँकेत
अधिकाधिक लोक आपली खाते उघडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी देशात प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते हा प्रमुख कार्यक्रम झाला. त्याचे सजीव चित्रण दाखविण्यात आले.
मान्यवरांनी या सजीव चित्रणाचा लाभ घेतला.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी
कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व फीत कापून शाखेचे उद्घाटन केले. डाक अधीक्षक राजेश
रणाळकर यांनी प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ
व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी खासदार
पाटील यांचे बँकेत खाते उघडून त्यांना क्यूआर कोड सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
याचप्रमाणे पाच खातेदारांना प्राथमिक स्वरूपात
क्यूआर कोड कार्डचे वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 13 भाषेत उपलब्ध
असलेल्या मोबाईल ॲप्सद्वारे कोणताही भारतीय आपले खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत
उघडू शकतो. याला कुठलाही अकाउंट नंबर नाही पॅनकार्डची आवश्यकता नाही. केवळ
आधारकार्ड असल्यास खाते उघडता येते. जिल्ह्यात आज एकूण पाच ठिकाणी इंडियन पेमेंट
पोस्ट बँकेच्या शुभारंभ करण्यात आला. त्यापैकी तीन ग्रामीण भागात व दोन शहरी भागात
आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश पवार यांनी तर
आभार प्रदर्शन गोपाल पाटील केले. कार्यक्रमास डाक विभागातील अधिकारी, कर्मचारी
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment