जळगाव दि. 1 :- जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतागृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी वर्षामध्ये 15 दिवस सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करता येते. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी अकरा दिवस जाहिर केले आहे. तर उर्वरित चार दिवस स्थानिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
त्यानुषंगाने जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी जिल्ह्यात दि. 19 फेब्रुवारी, 2018 शिवजयंती, दि. 14 एप्रिल, 2018 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक 17 सप्टेंबर, 2018 रोजी गणपती उत्सव (5 वा दिवस), दिनांक 19 सप्टेंबर रोजी गणपती उत्सव (7 वा दिवस), दि. 23 सप्टेंबर रोजी गणपती उत्सव (शेवटचा दिवस), दि. 17 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव (अष्टमी), दि. 17 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सव (नवमी), दि. 7 नोव्हेंबर रोजी दिपावली (लक्ष्मीपुजन), दि. 20 नोव्हेंबर रोजी ईद ए मिलाद, दि. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस, आणि दि. 31 डिसेंबर रोजी वर्षअखेर या तारखेस ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजविण्याकरिता सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपावेतो सुट जाहिर केली असून उर्वरीत 4 दिवस स्थानिक परिस्थितीनुसार ऐनवेळी जाहिर करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमुद बाबींचे तंतोतंत पालन करावे व मा. न्यायालयाचे आदेशाच उल्लघंन होणार नाही याची काळजी घ्यावी. ही सुट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्राला लागु राहणार नाही. ध्वनीक्षेपक व ध्ननिवर्धक वाजविणेकामी सुट दिलेनंतर ध्वनी प्रदुषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे. असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:
Post a Comment