Wednesday, 19 September 2018

ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांतील आठवडे बाजाराच्या दिवसात बदल


        जळगाव, दि. 19 - जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने या ग्रामपंचायतीच्य सरपंच पदासह सर्व सदस्य पदासाठी सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम दिनांक 26 सप्टेंबर, 2018 रोजी घोषित करण्यात आला आहे.
            या निवडणुकीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीकोनातुन बुधवार, दिनांक 26 सप्टेंबर, 2018 रोजी या दिवशीच्या आठवडे बाजाराचा दिवस वगळून इतर दिवशी भरविण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी  किशोर राजे निंबाळकर यांनी दिले आहे.
            मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींचा  तपशिल याप्रमाणे - जामनेर - डोहरी, भारुडखेडा,  धरणगाव -पष्टाणे खु., रावेर - आंदलवाडी, भडगाव - घुसर्डी खु., पारोळा - मोंढाळे प्र.अ. या गावांमधील आठवडे बाजार बुधवार दि. 26 सप्टेंबर, 2018 रोजी येत असल्यास तो इतर दिवशी भरविण्यात यावा असे आदेश जिल्हादंडाधिकारी श्री. निंबाळकर यांनी दिले आहे.
०००

No comments:

Post a Comment