जळगाव, दि. २८ - शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने
‘लोकराज्य वाचक अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानास जळगाव शहरातील
बी.यू.एन.रायसोनी शाळेने उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत शाळेतील सर्व शिक्षक वृंदांसह
विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार होऊन सक्रीय सहभाग नोंदविला.
बी. यू. एन. रायसोनी शाळेचे अध्यक्ष
शिरीष रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर
पाटील, मुख्याध्यापिका सौ.रेखा कोळंबे यांनी शाळेतील सर्व शिक्षक व
विद्यार्थ्यांना लोकराज्य अंकाचे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी प्रोत्साहित केले.
आणि या शाळेतील सर्व शिक्षक ‘लोकराज्य’ मासिकाचे वर्गणीदार झाले. वार्षिक वर्गणीचा
एकत्रीत धनादेश जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांचेकडे मुख्याध्यापक
चंद्रशेखर पाटील यांनी सुपूर्द केला. याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके
यांनी शाळेचे अभिनंदन केले.
पुस्तके अथवा ग्रंथ यांच्यासारखा दुसरा गुरू नाही असे माणून
वाचन संस्कृती रूजविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन करणे गरजेचे आहे. शाळेतील
मुलांनी पाठ्यक्रमातील पुस्तकांशिवाय अवांतर वाचन करणे खूप गरजेचे आहे. शासनाने
घेतलेल्या निर्णयांचे प्रतिबिंब या अंकात पाहायला मिळत असल्याने लोकराज्य मासिक
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे या शाळेमध्ये
नियमितपणे लोकराज्यमधील लेखांचे वाचन सर्व विद्यार्थ्यांसमोर करण्यात येणार
असल्याचेही मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment