Friday, 7 September 2018

जिल्ह्यातील प्रमूख बसस्थानकांवर प्रवाशांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी परिवहन मंत्र्यांना भेटणार - सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील


            जळगाव, दि. ७ - ग्रामीण भागातील जनतेचे प्रवासचे प्रमुख साधन हे एसटी आहे. अनेक नागरीक एसटीनेच प्रवास करतात. या नागरीकांना बसस्थानकांवर तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा ठिकाणाच्या बसस्थानकांवर प्रवाशांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी. याकरीता परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांची भेट घेणार असल्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
            जिल्ह्यातील परिवहन विभागाची आढावा बैठक राज्यमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अजिंठा शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली, यावेळी त्यांनी वरिलप्रमाणे निर्देश दिलेत. या बैठकीस विभागीय नियंत्रक राजेंद देवरे यांचेसह जिल्ह्यातील आगारप्रमुख उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, एसटी ने सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या पासेसची रक्कम वाढविली असल्याने विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडला आहे. एवढेच नाहीतर ग्रामीण भागातील काही मुलींना महाविद्यालयात येणे अशक्य होत असल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पासेसची रक्कम कमी करण्यासाठी परिवहन मंत्र्यांना विनंती करणार असल्याचेही  त्यांनी सांगितले. यावेळी ना. पाटील यांनी जिल्ह्यातील एसटी निवाऱ्यांची सि्थती, शालेय विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत एसटी ची सेवा उपलब्ध होते काय आदिंचा आढावा घेतला. तसेच नशिराबाद येथे नवीन बसस्थानक निर्मितीबाबतचा प्रस्ताव त्वरीत सादर करण्याच्या सुचनाही ना. पाटील यांनी विभागीय नियंत्रकांना दिल्यात.
            परिवहन विभागाने शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयातच पास उपलब्ध करुन द्यावेत. विद्यार्थ्यांना बसस्थानकात येण्याची आवश्यकता भासू नये याबाबतचे नियोजन करावे. एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये प्रथमोपोचार पेटी ठेवावी. परराज्यातील बसेसची तपासणी करावी. वाहक व चालकांना गणवेशतातडीने उपलब्ध करुन द्यावेत. जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांवर सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. तसेच बसस्थानकांवरील हिरकणी  कक्ष सुरु राहतील याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.  
000

No comments:

Post a Comment