जळगाव, दि. 24- केंद्र शासनाने आधारभूत किमत खरेदी योजनेतंर्गत खरीप पणन
हंगाम 2018-19 मधील धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहिर केल्या आहेत.
अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी दिली आहे.
केंद्र शासनाने जाहीर केल्यानुसार
शेतकऱ्यांच्या माहितीसाठी धान व भरडधान्याचे दर पुढीलप्रमाणे- भात-सर्वसामान्य 1750 रु. क्विंटल,
भात-ग्रेड ए 1770 रु. क्विंटल, ज्वारी- हायब्रीड 2430 रु. क्विंटल,
ज्वारी-मालदांडी 2450 रु. क्विंटल, बाजरी 1950 रु. क्विंटल, नाचणी 2897 रु.
क्विंटल, मका 1700 रु. क्विंटल असे दर ठरविण्यात आले असल्याचे जिल्हा पुरवठा
अधिकारी राहुल जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment