जळगाव, दि. 30 :- राज्याचे
महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम
मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री
ना. श्री. चंद्रकांत पाटील हे जळगाव
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
सोमवार
दि. 1 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 8.55 वा. महाराष्ट्र एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे
स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह भुसावळकडे प्रयाण. सकाळी
9.10 वा. शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.00 वा. शासकीय
विश्रामगृह भुसावळ येथून शासकीय वाहनाने फैजपूर ता. यावलकडे प्रयाण. सकाळी 10.30
वा. शेतीतील अर्थशास्त्र या विषयावरील चर्चासत्र व अटल महाकृषि शिबीर, कृषि
प्रदर्शन उदघाटनास उपस्थित. (स्थळ :- जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय,
फैजपुर,ता.यावल, जि.जळगाव), दुपारी 1.00 वा. फैजपुर येथून शासकीय वाहनाने जळगावकडे
प्रयाण. दुपारी 2.00 वा. गंधे सभागृह, सेंट ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव
येथे आगमन व जळगाव जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
वितरण समारंभास उपस्थिती. दुपारी 2.50 वा. शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय,
जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.00 वा. आगमन व सन 2018-19 करीता जळगाव जिल्ह्यातील
पिण्याचे पाणी आरक्षित करणेबाबत बैठक. (स्थळ:- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय,
जळगाव), दुपारी 3.30 वा. जळगाव जिल्हा नियोजन समितीची बैठक, (स्थळ :- नियोजन भवन,
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सायं. 5.15 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
येथून शासकीय वाहनाने मुसळी फाटा, ता. धरणगावकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. मुसळी
फाटा, ता. धरणगाव येथे आगमन व हायब्रीड ॲन्युएटीच्या कामाचे प्रातिनिधीक स्वरुपात
भूमीपूजनास उपस्थिती. सायं 7.00 वा. मुसळी फाटा येथून शासकीय वाहनाने जळगावकडे
प्रयाण. सायं. 7.30 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन, राखीव व
मुक्काम.
मंगळवार
दि. 2 ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी 8.00 वाजता. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव
येथून शासकीय वाहनाने शिवणा ता. सिल्लोड, जि.औरंगाबादकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment