जळगाव,दि.29:-
राज्याचे
वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. गिरीष महाजन हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
दिनांक 1 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी
7.50 वाजता मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.00 वाजता
जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने फैजपूर ता.यावलकडे प्रयाण. सकाळी 10.00
वाजता फैजपूर येथे आगमन व अटल महाकृषी कार्यशाळा (शेतीतील अर्थकारण) या कार्यक्रमांस
अध्यक्ष म्हणून उपस्थिती. दुपारी 12.00 वाजता फैजपुर येथून शासकीय वाहनाने
जळगावकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व
राखीव. दुपारी 3.00 वाजता जिल्हा नियोजन समिती बैठक (मा. चंद्रकांत पाटील, महसूल
मंत्री यांचे अध्यक्षतेखाली तसेच 2018-2019 करीता पिण्याच्या पाण्याचे आरक्षण बैठक.
स्थळ: जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,जळगाव), दुपारी 4.00 वाजता बांबु
शेती कार्यशाळेस प्रमुख उपस्थिती (स्थळ :- छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, जळगाव)
सोईनुसार शासकीय वाहनाने जामनेर जि.जळगावकडे प्रयाण. सोईनुसार जामनेर जि.जळगाव
आगमन व राखीव.
0000
No comments:
Post a Comment