Wednesday, 26 September 2018

औषध विक्री सुरु ठेवण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन नियंत्रण कक्षाची स्थापना


       जळगाव, दि.26-  ऑल इंडिया ऑर्गनाईझोशन केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट यांनी दि. 28 सप्टेंबर 2018 रोजी घोषित केलेल्या देशव्यापी बंदच्या अनुषंगे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, म. राज्य जळगाव यांचेतर्फे सर्व परवाने धारकास आवाहन करण्यात येते की, सदर बंदमध्ये सहभागी न होता नेहमीप्रमाणे आपली सेवा अखंडीतपणे चालु ठेवावी जेणेकरुन सर्व सामान्य नागरीक व रुग्णास औषधाचा तुटवडा भासणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, औषध विक्रेत्यांनी औषध दुकाने बंद ठेवल्यास त्यांनी या बंदच्या काळात तसेच औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व सरकारी, निमसरकारी रुग्णालयात पुरेशा प्रमाणात औषध साठा उपलब्ध करण्याबाबत सुचित केलेले आहे. तसेच रुग्णांच्या सोईकरिता खाजगी रुग्णालये व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषध साठा त्यांचेकडे ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
           प्रशासनातर्फ बंद काळात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. सदरील नियंत्रण कक्षाचा पत्ता व संपर्कक्रमांक खालील प्रमाणे आहे.
            नियंत्रण कक्ष, सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट राज्य, एफ -13 ते एफ -16 पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट जिल्हा पेठ, जळगाव.
            तसेच या कार्यालयातील खालील नमूद औषध निरीक्षक या नियंत्रण कक्षात उपलब्ध असतील. दूरध्वनी क्र. 0257-2217476, श्री. मा.न.अय्या, औषध निरीक्षक, जळगाव शहर – 8888806825, श्री. म.बा.कवटीकवार, औषध निरीक्षक, तालुका – चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर व बोदवड, -9028866959, श्री. जो.मॅ. चिरमेल, औषध निरीक्षक, तालुका – धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, अंमळनेर, यावल व जळगाव ग्रामीण – 9404629330 असे आवाहन सहा आयुक्त (औषधे) अन्न व औषध प्रशासन जळगाव वि.ता. जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                            ०००

No comments:

Post a Comment