Wednesday, 19 September 2018

आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते लोकराज्य स्टॉल चे उद्घाटन

 


            जळगाव, दिनांक 19 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या लोकराज्य वाचक अभियानातंर्गत आज जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव यांच्यावतीने फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लोकराज्य अंकाचा स्टॉल व प्रदर्शन लावण्यात आले होते. या स्टॉलचे उद्घाटन रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
            याप्रसंगी फैजपूर उपविभागाचे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, कृषीतज्ञ के. बी. पाटील, यावलचे तहसिलदार कुंदन हिरे, रावेरचे वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नंदिनी चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी गोरख लोखंडे,  विजय पाठक, दिपक नगरे यांच्यासह कृषि व वन विभागाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
            यावेळी आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते लोकराज्य स्टॉलचे फित कापून उद्घाटन करण्यात आले तसेच आमदार हरिभाऊ जावळे यांनी लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार होवुन या मोहिमेचा शुभारंभ केला. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी आमदार जावळे यांचा लोकराज्य मासिकाचा अंक देऊन स्वागत केले.
          लोकराज्य मासिकाच्या स्टॉलला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0

No comments:

Post a Comment