जळगाव, दि. 17 - दर महिन्याच्या तिसऱ्या
सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या
अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
यावेळी तहसीलदार, जळगाव, अधिक्षक भुमी अभिलेख,
जळगाव, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव, तहसिलदार, संजय गांधी निराधार
योजना, जळगाव यांचेशी संबंधित तर एक अर्ज अस्वीकृत करण्यात आला.
प्राप्त
झालेले सर्व तक्रार अर्ज संबंधीत विभागांकडे पुढील कार्यावाहीस्तव पाठविण्यात आले
असून विभागांनी तक्रार अर्जाचा लवकरात लवकर निपटारा करावा. अशा सूचना अप्पर
जिल्हाधिकारी श्री. गाडीलकर यांनी सर्व संबंधितांना दिल्यात.
याप्रसंगी जिल्हा उपनिबंधक
सहकारी संस्थाचे प्रतिनिधी, सदस्य सचिव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व
संरक्षण अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षांनी महिला लोकशाही दिनातील
प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेऊन तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली
काढण्याच्या सुचना दिल्यात. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment