जळगाव, दि. 18 - महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या सहका-याने ॲनिमल राहत ही
एक कष्ट करणा-या प्राण्यांच्या जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी समर्पित नफाविरहीत
संस्था आहे. जळगाव जिल्ह्यातील सरकारी पशुवैद्यकांना मानवी पध्दतीने बैलांमधील
खच्चीकरण दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय,
महाबळ कॉलनी रोड, जळगाव येथे नुकताच संपन्न झाला.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात याबाबतचे
प्रशिक्षण आयोजित करण्यांत येणार आहे. प्रशिक्षण हे मानवीय पध्दतीने हाताळणी आणि
बैलांना काबू करणे, उपशाकम, वेदनाशामक आणि निस्तेजक औषधाचा एकत्रित वापर करवून
बैलांना खच्चीकरणपूर्वी भूल देवून, आणि खच्चीकरणानंतर वेदनेचे व्यवस्थापन
करण्यासाठी वेदनाशामक औषधाने उपचार करणे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास डॉ. चेतन यादव, डॉ.
नरेश उप्रती, डॉ. एस.जे. गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव व डॉ. पी. एस.
इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, डॉ. एन. इ. पाटील, प्र.
सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन व जिल्हयातील सर्व पशुवैद्यकीय क्षेत्रिय अधिकारी
उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment