जळगाव दि.
12 – महाराष्ट्र शासनाने जनहिताच्या दृष्टीने सुरु केलेले लोकराज्य मासिक हे प्रत्येक
व्यक्तीचे विचार आणि त्यांच्या ज्ञानात भर घालणारे असून विद्यार्थ्यांना त्यांच्या
भावी आयुष्यासाठी प्रेरणादायी असल्याने यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडविणारे
असल्याचे रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री.व्ही.एस.नाईक कला, वाणिज्य
व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल यांनी बोलतांना सांगितले. जिल्हा माहिती कार्यालय जळगाव आणि श्री.व्ही.एस.नाईक
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात
लोकराज्य वाचक अभियाना अंतर्गत वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा माहिती
अधिकारी विलास बोडके, रावेर तहसीलदार विजयकुमार ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र
राणे, महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल, लक्ष्य अकादमीचे संचालक विजय पाटील,
श्रीराम फौन्डेशनचे सचिव दीपक नगरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे
बोलतांना प्राचार्य श्री..दलाल म्हणाले की, स्पर्धेच्या युगात आपणास टिकायचे असेल तर
आपणास आपल्या परिसरासह जगाची माहिती ठेवणे आवश्यक आहे आणि ती फक्त वाचन केल्यानेच आपणास
अवगत होईल म्हणून सर्वानी लोकराज्य वाचक अभियानाचा लाभ घेऊन स्वतःचा आणि आपल्यासोबतच
इतरांचे व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य करण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लोकराज्य
मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
आज प्रत्येक
विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थाना आपले जीवन सुकर कसे बनवावे याकडे ओढ लागलेली
आहे. त्यासाठी नियमित वाचन करणे आवश्यक आहे. शासनाच्या लोकराज्य मासिकातून आपल्याला
योग्य आणि फायदेशीर माहिती आपणास उपलब्ध झालेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली
वैचारिक पातळी उंचावण्यासाठी या मासिकाचे वाचन करणे गरजेचे असल्याचे तहीलदार विजयकुमार
ढगे यांनी सांगून आगामी निवडणुकीत नव मतदार नोंदणी सुरु असून मतदार यादी विषयक दावे
आणी हरकती मागविण्यात येत आहेत यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे देखील त्यांनी आवाहन
केले. वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की, सोशल
मीडियाच्या युगात तंतोतंत खरी माहिती मिळणे अवघड आहे. परंतु लोकराज्य मासिक सर्वांच्या
हिताचे असून समाज घटकातील प्रत्येक व्यक्तीस उपयुक्त असे मासिक असल्याचे सांगून त्यांनी
वन विभागाकडून 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्यासाठी हरित सेनेत
आपली नोंदणी करण्याचे देखील त्यांनी आवाहन केले आहे.
लोकराज्य वाचक
अभियानाचा उद्देश तसेच युवा माहिती दूत उपक्रमाबाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी
विलास बोडके यांनी विषद केली. स्पर्धा परीक्षेची
तयारी करत असतांना लोकराज्य मासिकाचा होणारा फायदा, राज्याचे अर्थकारण, विकास याचे
खात्रीलायक आकडेवारी आपणांस याच मासिकातून उपलब्ध होतात असे लक्ष्य करिअर अकादमीचे
संचालक विजय पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्रीराम फौंडेशनचे
सचिव दीपक नगरे यांनी लोकराज्य वाचक मेळावा आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या
सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे प्राचार्य डॉ.पी.व्ही.दलाल यांच्या हस्ते पुष्प गुच्छ
देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयाच्या सातपुडा या वार्षिक नियतकालिक अंकाचे
प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा माहिती दूत उपक्रमाची चित्रफित
विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.आर.ढेबरे यांनी
तर उपस्थितांचे आभार प्रा.एस.डी.धापसे यांनी मानले. या मेळाव्यास महाविद्यालयाचे प्राध्यापक,
कर्मचारी व विध्यार्थी विध्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment