Wednesday, 19 September 2018

पारोळा येथील आठवडे बाजार रविवार ऐवजी सोमवारी भरणार


        जळगाव, दि. 19 - पारोळा शहरात दर रविवारी भरणारा आठवडे बाजार येत्या रविवार, दि 23 सप्टेंबर रोजी येत आहे. रविवार, दि 23 सप्टेंबर रोजी गणेश विर्सजन असल्याने व विर्सजन मिरवणूकीचा मार्ग हा बाजारपेठेतून जात असल्याने या सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पारोळा येथील आठवडे बाजाराच्या दिवसात बदल करण्याबाबत मुख्याधिकारी यांनी विनंती केली आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पारोळा येथील आठवडे बाजार रविवार, दि. 23 सप्टेंबरऐवजी सोमवार, दि 24 सप्टेंबर रोजी भरविण्यात यांना असे आदेश दिले आहे. 
000

No comments:

Post a Comment