Wednesday, 19 September 2018

यावल येथील आठवडे बाजार शुक्रवार ऐवजी शनिवारी भरणार


        जळगाव, दि. 19 - यावल शहरात दर शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार येत्या शुक्रवार, दि 21 सप्टेंबर रोजी येत आहे. शुक्रवार, दि 21 सप्टेंबर रोजी मुस्लीम बांधवांचा मोहरम हा सण साजरा होत असल्याने या सणानिमित्त कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने यावल येथील आठवडे बाजाराच्या दिवसात बदल करण्याबाबत मुख्याधिकारी यांनी विनंती केली आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी यावल येथील आठवडे बाजार शुक्रवार, दि. 21 सप्टेंबरऐवजी शनिवार, दि 22 सप्टेंबर रोजी भरविण्यात यांना असे आदेश दिले आहे. 
०००

No comments:

Post a Comment