Saturday, 29 September 2018

लोकशाही दिन पहिल्या सोमवार ऐवजी दुसऱ्या सोमवारी


            जळगाव, दि.30 :- दर  महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन या महिन्यात दुसऱ्या सोमवारी होणार आहे. 
            सोमवार, दिनांक 1 ऑक्टोबर, 2018 रोजी जिल्हा नियोजन विकास समितीची (DPDC) बैठक आयोजित करण्यात आली असल्याने सदरचा लोकशाही दिन हा सोमवार, दिनांक 8 ऑक्टोंबर,2018 रोजी दुपारी तीन वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे.
            ज्या नागरीकांच्या तक्रारी असतील त्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन स्वत: उपस्थित राहून मांडाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले आहे.                                              
०००

No comments:

Post a Comment