Thursday, 13 September 2018

‘लोकराज्य’ चा शैक्षणिक क्रांतीचे जनक : राजर्षी छत्रपती शाहू महाराज विशेषांक प्रकाशित




जळगाव, दि. 13 - लोकराज्य मासिकाचा सप्टेंबर महिन्याचा अंक हा शैक्षणिक क्रांतीचे जनक : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाचे विविध पैलू मांडणारा अंक असून या अंकाचे प्रकाशन ऐनपूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्रीराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने, संस्थेचे सचिव संजय पाटील, द युनिक अकादमीचे संचालक सुनिल देशमुख, लक्ष्य करिअर अकादमीचे विजय पाटील, श्रीराम फौन्डेशन चे सचिव दीपक नगरे, कृष्णा पाटील आदी उपस्थित होते.
            माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरमहा लोकराज्य मासिक प्रकाशित करण्यात येते. या महिन्याच्या लोकराज्य मासिकाचे अतिथी संपादक राज्याचे कामगार, भूकंप पूर्नवसन, कौशल्य विकास तथा माजी सैनिकांचे कल्याणमंत्री ना. संभाजी पाटील-निलंगेकर आहेत.
त्यांचा ‘शैक्षणिक क्रांती’ या विषयावरील विशेष लेख. तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र  फडणवीस यांनी देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त ‘दो शेरों के बीच खडा हूँ!’ या लेखाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतिंना दिलेला उजाळा. त्याचबरोबर खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा ‘कविमनाचे खंबीर नेतृत्व’, राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. विनोद तावडे यांचा द्रष्टा राजर्षी  हे लेख वैशिष्टपूर्ण आहेत.
याशिवाय डॉ. भालबा विभूते यांचा शैक्षणिक क्रांतीचे जनक, डॉ. संभाजी खराट यांचा गाव तिथे शाळा, डॉ. गो. मा. पवार यांचा सामाजिक समतेचा अधिष्ठाता, वर्षा फडके-आंधळे यांचा शिका आणि समर्थ व्हा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, पुणेचे संचालक धनराज माने यांचा संधी आणि प्रेरणा याशिवाय अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी योजना, यशाची चैतन्यदायी प्रेरणा सदरात राज्यातील विविध जिल्ह्यामधील यशकथांचा या अंकात समावेश आहे.
याशिवाय महाराष्ट्रातील ठळक घडामोडींमध्ये नोंदी, सायबर कायदा आणि सुरक्षा तज्ञ ॲङ प्रशांत माळी यांचा समस्या इलेक्टॉनिक कचऱ्याची, डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा मिशन शेतीच्या भविष्यासाठी!. युवा माहिती दुत, शासन आपल्या दारी असे लोकोपयोगी सदर या अंकात प्रसिध्द झाले आहेत.

हा अंक जिल्ह्यातील सर्व प्रमुख स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. अंकाची किंमत फक्त दहा रुपये आहे.
या अंकाचा जास्तीत-जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment