जळगाव, दि. 12- सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत अखिल भारतीय व्यवसाय
परिक्षा फेब्रुवारी 2009 ते ऑगस्ट,2017 या कालावधीत परिक्षांची अंतिम प्रमाणपत्र
(BBBT & ADVANCED MODULE) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे करण्यात
येणार आहे. तरी सी ओ ई चे प्रमाणपत्र घेण्यासाठी संस्थेत स्वता: यावे. वाटप दिनांक
12 सप्टेंबर 2018 पासून करण्यात येणार आहे. सोबत एक पासपोर्ट साईजचा फोटो व
त्यांचेकडे असलेले सी ओ ई चे गुणपत्रक, तसेच फोटो असलेले ओळखपत्र उदा. आधारकार्ड
सोबत आणावेत. असे आवाहन श्री. डी. ए. महाजन प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
भुसावळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
००००
No comments:
Post a Comment