जळगाव, दि. 17 - अनुसूचित जमातीच्या
विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परिक्षा फी (फ्रिशिप) योजनेसंबधी
महाविद्यालय पातळीवर तसेच विद्यार्थीस्तरावर अर्ज प्रलंबित (hold) असलेले पात्र
विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने तसेच हार्ड कॉपी आवश्यक कागदपत्रांसह एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे दि. १८ सप्टेंबर, २०१८ पर्यंत सादर
करावेत. असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी केले आहे.
आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत
असलेल्या जिल्ह्यातील महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना जाहिर आवाहन करण्यात येते
की, 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनामार्फत शिष्यवृत्तीच्या सर्व
योजना Mahadbt या संकेतस्थळावरुन सुरु करण्यात
येणार असल्यामुळे पुर्वीचे ई- ट्रायबल हे संकेतस्थळ बंद होणार आहे. भारत
सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत https://etribal.maharashtra.gov.in या संगणक अज्ञावलीतील सन
2012-13 ते 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे
मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फि परिक्षा फि (फ्रि शिप) योजनेसंबधी महाविद्यालय पातळीवर
तसेच विद्यार्थीस्तरावर अर्ज प्रलंबित (hold) असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज
ऑनलाईन पध्दतीने तसेच हार्ड कॉपी आवश्यक कागदपत्रासह दि. १८ सप्टेंबर, २०१८ पर्यंत
सादर करावेत. ई ट्रायबल या संगणक आज्ञावलीतील प्रलंबित असलेले कोणतेही अर्ज
महाडिबीटी पोर्टलव्दारे निकाली काढण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
तसेच सन २०१२-१३ ते २०१७-१८ या
कालावधीत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज सादर
करता आले नाहीत. अशा विद्यार्थ्यांकरिता ई-ट्रायबल संगणक अज्ञावली १७ सप्टेंबर,
२०१८ पर्यत सुरु करण्यात आली असून, वंचित विद्यार्थ्यांनी सदर संगणक अद्यावली
मध्ये ऑनलाईन अर्ज भरुन संबधीत महाविद्यालयाकडे अर्ज व सहपत्र सादर करावे. ऑनलाईन
अर्ज भरणेसाठी ही अंतिम संधी देण्यात येत आहे.
सर्व महाविद्यालयांनी याबाबतची सुचना
महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करावी. ई-विकास प्रणालीबाबत काही
तांत्रिक अडचणी उदभवल्यास ctdnsk@yahoo.com,
etribal.support@maharashtra.gov.in व po.yawal@yahoo.in या ईमेलवर सादर करावेत.
शिष्यवृत्तीचे परिपूर्ण प्रस्ताव मुदतीत सादर न केल्यास विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती पासून वंचित राहवे लागले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत
महाविद्यालयाची राहील. असे आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment