Saturday, 29 September 2018

अटल महाकृषी मेळाव्याचे १ ऑक्टोबरला न्हावी येथे आयोजन


             जळगाव दिनांक २९ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी   आमदार हरिभाऊ जावळे यांच्या पुढाकाराने प्रयत्न करण्यात येत असून त्यानिमित्त अटल महाकृषी मेळावा व शेतीतील अर्थशास्त्र या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
            यावल तालुक्यातील न्हावी येथील जे. टी. महाजन इंजिनिअरींग कॉलेजमध्ये १ ऑक्टोबर, 2018 रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ‘अटल महाकृषी मेळावा’ आयोजित केला आहे.  या मेळाव्यास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी व महसूल मंत्री  तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
            या मेळाव्यात जिल्ह्यातील सुमारे २ हजार युवा शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून या कार्यक्रमासाठी  परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment