Saturday, 29 September 2018

वित्त व नियोजन, वने मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचा जिल्हा दौरा

        जळगाव दि. 29- राज्याचे वित्त व नियोजन, वने मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
         सोमवार दि. 1 ऑक्टोंबर, 2018 रोजी सकाळी 7.50 वाजता मुंबई विमानतळ येथून शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय वाहनाने फैजपूर ता. यावलकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा. फैजपूर येथे आगमन व शेतीतील अर्थकरण या विषयावरील चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ :- जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, न्हावी मार्ग, फैजपूर ता. यावल). दुपारी 12.00 ते 1.00 वाजेपर्यंत राखीव. दूपारी 1.00 वा. शासकीय वाहनाने फैजपूर येथून भुसावळकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. भुसावळ येथे आगमन व जळगाव तरुण भारतच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ :- सुराणा ट्रेडर्स, आयडीबीआय बँकेच्यावर, भुसावळ), दुपारी 1.45 वाजता जळगाव तरुण भारत आयोजित थेट संवाद कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :- संतोषी माता हॉल भुसावळ), दुपारी 2.45 वाजता शासकीय वाहनाने भुसावळहून जळगावकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. सायं 4.00 वाजता बांबू शेती व त्यांचे विकासाबाबत बांबू शेती मेळाव्यास उपस्थिती. (स्थळ :- छत्रपती संभाजीराजे नाटयगृह, जळगाव), सायं 5 .30 वा. शासकीय वाहनाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. सायं 6.00 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने नागपूरकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment