Tuesday, 11 September 2018

डाक अदालत 24 सप्टेंबर रोजी


        जळगाव,दि.-11  पोस्टाच्या कामांसंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नसेल अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव येथे दि.24 सप्टेंबर  रोजी दुपारी चार वाजता  डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतित अधिक्षक डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव 425001 या पत्त्यावर दि.17 सप्टेंबर 2018 पुर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. मुदतीनंतर आलेल्या तक्रारींचा निपटारा केला जाईल, परंतू डाक अदालतीत समावेश केला जाणार नाही. असे अधिक्षक, डाकघर, जळगाव यांनी कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment