जळगाव, दि. 27- वैधमापन शास्त्र यंत्रणेकडुन वजने मापे यांची विहीत मुदतीत
फेरतपासणी व मुद्रांकन करुन न घेणा-या उपयोगकर्त्यांवर विशेष मोहीम राबवुन
कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या करिता वजने मापे उपयोगकर्ता यांनी
त्यांचे जवळील सर्व वजने व मापे यांची फेरतपासणी व मुद्रांकन दिनांक 30 सप्टेंबर
2018 चे आत करुन घ्यावी व पुढील कायदेशीर कार्यवाही टाळावी असे आवाहन सहाय्यक
नियंत्रण, वैधमापन शास्त्र, जळगाव जिल्हा यांनी केले आहे.
वजने मापे उपयोगकर्ता
यांनी त्यांचेकडील वजने व मापे यांचे पडताळणी व मुद्रांकनासाठी जवळचे निरीक्षक, वैधमापन
शास्त्र यांचे कार्यालय अथवा शिबीर कार्यालयाशी संपर्क करावा असे सहाय्यक
नियंत्रक, वैधमापन शास्त्र जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment