Monday, 17 September 2018

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज महा अवयवदान रॅलीचे आयोजन


        जळगाव, दि. 17 - अवयवदानाला चालना मिळावी याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांचे सौजन्‍याने मंगळवार, 18 सप्टेंबर, 2018 रोजी महाविद्यालयाचे आवारात सकाळी 8 वा. महा अवयवदान अभियानाअंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
            नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्याआधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाव्दारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. त्यासाठी जनतेतून अवयवदानाला चालना मिळावी, याकरिता राज्यस्तरावर विविध कार्यक्रम हाती येऊन जनजागृती होण्यासाठी सन 2016 पासून महा अवयवदान अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षीही महा अवयवदान महोत्सव साजरा करण्याचा शासनाचा मानस असल्याचे डॉ. खैरे यांनी सांगितले.
०००

No comments:

Post a Comment