जळगाव, दि. 14 - महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियानातंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर पाणीवापर संस्था पुरस्कार स्पर्धा प्रादेशिकस्तरावर व राज्यस्तरावर घेण्यात
येणार आहे. या स्पर्धेसाठी कार्यान्वित पाणी वापर संस्थांकडून विहित नमुन्यात
प्रादेशिक स्तरावरील पुरस्कारासाठी नामांकने मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेसाठी
इच्छूक कार्यान्वित पाणी वापर संस्थांनी कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे
विभाग, जळगाव/गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव आणि धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांचेकडे
नामांकन 15 ऑक्टोबर, 2018 दाखल करावीत. असे आवाहन कि. ज. अटांळे, कार्यकारी
अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी केले आहे.
नामांकनाबाबत
माहिती प्रपत्रे उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, यावल, जामनेर, चोपडा,
पाचोरा यांचेकडे मिळतील. नामांकन दाखल करण्याचा कालावधी 15 सप्टेंबर ते 15
ऑक्टोंबर, 2018 असा आहे.
प्रादेशिकस्तर
पुरस्काराचे स्वरुप प्रथम क्रमांक 3 लाख रुपये व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांक 2
लाख रुपये व प्रशस्तीपत्रक. तर राज्यस्तर पुरस्कार- प्रथम क्रमांक 7 लाख रुपये व
प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांक 5 लाख रुपये व प्रशस्तीपत्रक आणि तृतीय क्रमांक 3
लाख रुपये व प्रशस्तीपत्रक असे आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पाणी वापर
संस्थांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात
आले आहे.
०००
No comments:
Post a Comment