Saturday, 29 September 2018

दिव्यांग व्यक्तींच्या अधिकाराबाबत १२ ऑक्टोबर रोजी जळगावात कार्यशाळेचे आयोजन

             जळगाव, दि. २९:-  देशातील दिव्यांग व्यक्तींच्या हक्क व अधिकारांबाबत केंद्र शासनाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींचे अधिकार अधिनियम २०१६ हा कायदा पारीत करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार सुधारीत व नवीन बाबीचा अधिकाधीक लाभ समाजातील दिव्यांग व्यक्तींना मिळवुन देण्याच्या हेतूने जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, इंडियन रेडक्रॉस सोसायटी व केंद्र शासनाचे क्षेत्रीय केंद्र, CRC नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑक्टोबर, २०१८ रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

            या कार्यशाळेत केंद्र शासनाचे क्षेत्रीय केंद्र, नागपूर येथील तज्ञ प्रशिक्षक या कायद्याबाबत समग्र मार्गदर्शन करणार आहेत. नवीन कायद्याचा प्रचार-प्रसार व कायद्याची ओळख होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, संघटना, विविध शासकीय विभाग, दिव्यांग मुलांच्या विशेष शाळा, प्रसार माध्यमे यांना सदर कार्यशाळेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन केंद्र शासनाच्या जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातर्फ करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव दुरध्वनी क्रमांक.  ०२५७-२२६०५२८ या पत्त्यावर सहभाग नोंदविण्यात यावा. असे आवाहन केंद्र प्रमुख, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment